Monday, September 4, 2017

एका वैश्विक साधनेबद्दल

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

सोहं अर्थात अजपा गायत्री
आज एका वैश्विक साधनेबद्दल
*****अविनाश जमदाडे********
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मनुष्याच्या देहाचे स्वतंत्रपणे कार्य सुरू होते पहिला श्वास घेतल्याने ! आणि शेवट होतो शेवटचा श्वास सोडल्याने !
या दोन श्वासाताच जीवन सुरू असते व श्वास सुरू असतो अव्याहतपणे 
आपल्या शरीरात सहनुकंपी आणि परानुकंपी चेतासंस्था असतात आपल्या श्वासाचे वैशिष्टय असे असते की याचा संबंध दोन्हीशी येतो त्यामुळे आपला श्वास आपण नियंत्रण व जाणीव न ठेवता देखील आपोआप चालू राहतो (उदा:श्वासोच्छवास)
तसेच काही प्रमाणात आपण त्यावर जाणीवपूर्वक नियंत्रण देखील ठेऊ शकतो (उदा:प्राणायाम)
सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या देहाला व मनाला जोडणारा हा प्राणमय सेतू आहे शरीराचा व मनाचा एकमेकांचा परिणाम एकमेकांवर हा श्वासमार्फत समजून येतो 
उदा: काम,क्रोध,भय इ वेळी श्वासाची गती वाढते व शरीराच्या क्रिया देखील गतिशील होतात तसेच ध्यान,शांत संगीतश्रवण, निद्रा यामध्ये श्वासाची गति मंदावते तशीच देहाची देखील.
अनेकदा या श्वासाच्या नियंत्रणाने अनेक विकारयुक्त संस्कारांचे शमन करता येते ,मात्र त्यासाठी सजगता खूप आवश्यक आहे.
या श्वासाच्या साहाय्याने योगी देहावर व मनावर राज्य करतात व अनेक विस्मयकारी परिणाम दाखवतात.
कोणतेही जाणीवपूर्वक नियंत्रण न करता नैसर्गिक गतीने व्यक्ती साधारण २४ तासात २१,६०० वेळा श्वासोच्छवास करते. व हे नैसर्गिक भजन जन्मापासून मृत्यूपर्यंत अव्याहतपणे सुरू असते मात्र याकडे आपण जाणीवपूर्वक पहात नाही .
व याला देश,काल, व्यक्ती,लिंग याचा अडथळा नाही हा वैश्विक नियम आहे त्यामुळे जगातील प्रत्येक मानव याचा अधिकारी आहे.
भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या विपश्यना साधनेची सुरुवात ज्या आणापान साधनेने होते ती देखील या नैसर्गिक श्वासकडे यथाभूत दर्शनानेच केलेली आहे त्यामुळे देह व मनाला प्रशब्धी लाभून मन एकाग्र होते जे विपश्यना साधनेचे प्रमुख साधन आहे . त्याचप्रमाणे भारतातील तंत्र व योगाच्या ऋषी,मुनी,आचार्यांनी श्वास घेताना होणारा सोS व सोडताना होणारा हम या ध्वनिमुळे होणाऱ्या जपाला सोSहम या नावाने साधनेत सर्वोच्च स्थान दिले आहे यालाच अजपा गायत्री देखील म्हणले जाते. नाथ संप्रदाय व नाथसंप्रदायाच्या पायावर उभी असलेली आपली संतपरंपरा ,कबीरादी निर्गुण उपासक संत याच मार्गाने गेले 
धरितां सो सोडिता हं ।
सदा चाले सोहं सोहं ।।
संत जनाबाई म्हणतात 
सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला ||४||
जनी म्हणे बा विठ्ठला | जीवे न सोडी मी तुजला 
अशा अनेक पदात त्याचे वर्णन केले आहे.
तुकाराम महाराज देखील आपल्या गाथेत म्हणतात.
अभंग ४२६
सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथें ।
मी माजी हारपलें ठायीं जेथींचा तेथें । अदृश्य तें चि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥१॥
सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें । त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ध्रु.॥
टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा ।
न मागें मी भीक आतां हा चि जाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥२॥
ऊर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद ।
घेऊनि आला दान निजतत्व निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥३॥
शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागें येतील त्यांसीं ।
मागोनि आली वाट सिद्धिओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥४॥
वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ठाव ।
म्हणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव । तुका म्हणे हा चि संतीं मागें केला उपाव ॥५॥
अजपा ही सहजसाधना आहे याबाबत संत कबीर म्हणतात--
सहज सहज ही सब कहे,सहज न चिन्हे कोई ।
जीन सहजे विषया तजी, सहज कही जे सोई ।।
गोरक्षनाथांनी 'योगमार्तंड' या ग्रंथात या अजपा गायत्रीचे विवेचन केले आहे.
ते म्हणतात
"हंकारेण बहिर्याति सकारेण विशेत्पुनः ।
हंसो हंसेत्यमुं मंत्रम जीवो जपति सर्वदा: ।। 
अजपा नाम गायत्री यागीनां मोक्षदायिका ।
अस्य संकल्पमात्रेण नर: पापै: प्रमुच्यते ।।
अनया सदृशी विद्या अनया सदृशी जप: ।
अनया सदृश पुण्यं न भूतो न भविष्यति ।। "
या जपाच्या फलश्रुती बाबत अजून एक ठिकाणी म्हणले आहे 
ऐसा जाप जपो मन लाई,सोहं सोहं सुरता गाई ।
आसन दृढ करि करो ध्यान,अहर्निशी सुमिरो ब्रह्म-गियान ।।
नासा अग्र निज ज्यो बाई,ईडा पिंगला मधीसमाई ।
छ: सौ सहस्त्र इकीसौ जाप,अनहद उपजै आपही आप।।
बंक नाल मे उगै सूर,रोम रोम धुनि बाजै तूर ।
उलटै कमल सहस्त्र दल बास ,भ्रमर गुफा मे ज्योती प्रकाश ।।


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌙🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
😇😇😇😇😇😇शुभ दिन 😇😇😇😇😇😇

No comments:

Post a Comment

साधनेचे प्रमुख दोन प्रकार

जगातील सर्व धर्मातील साधना प्रमुख दोन प्रकारात विभागल्या गेल्या आहेत. आपल्या व्यक्तीमत्वानुसार आपण त्याची निवड करतो सर्व धर्माचे अंतिम ध...